पाली-सुधागडात तुफान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत.
पाली-सुधागडात तुफान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत.
भेरव येथे घराचे पत्रे उडून मोठे नुकसान, तर विजेचे खांब पडून वीज वाहिन्या तुटल्या.
पाली, ( निशांत पवार ) रायगड जिल्ह्यात शनिवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. विशेषतः पाली-सुधागड परिसरात अचानक आलेल्या तुफानी वादळवारा व मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी पावसासाचा वेग इतका प्रचंड होता कि भेरव येथे घरांवरचे छप्पर उडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर पाली मध्ये पालीवाला महाविद्यालयाच्या इमारतीचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे भेरव वाघोशी, खुरावले परिसरात व रस्त्यांवर जागोजागी झाडे पडून विद्युत खांब पडून विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत.
अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, तर वाहतुकीलाही फटका बसला. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती मिळत आहे.
पाली शहरासह सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली, तर शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच वीटभट्टी व्यवसायिकांचे देखील मोठं नुकसान झाले.
दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोसळलेली झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांतही काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times