"राज्याचा निकाल ९२.०९%, कोकण आघाडीवर"
मुलींनीच मारली बाजी
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाबतची माहिती दिली. राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे. १२वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे. कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्थापनेपासून कायम राखलेला राज्यातील अव्वल निकालाचा मान यंदाही अबाधित ठेवला आहे
फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी परीक्षेत कोकण मंडळाचा एकूण निकाल २७.६२ टक्के लागला, गतवी मार्च २०२५ मध्ये हा निकाल २८.८२ टक्के होता. त्यामुळे यंदा निकालात १.२० टक्क्यांनी घट झाली असली, तरी राज्यात कोकण मंडळाने पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागातील रलागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ६४० माध्यमिक विद्यालयांमधून ११४ परीक्षा केंद्रांवर एकूण २५ हजार २२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार १७२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले यांपैकी २४ हजार ५७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९७.६२ टक्के इतका लागला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. बोद्धचि अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाचतची माहिती दिली आहे. राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे. ९ विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला. छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वांत कमी लागला असून तो ८८.४१ टक्के लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. यावेळी ९४.९६ टक्के मुली तर ८९.५६ टक्के मूले उत्तीर्ण पास झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यानी अधिक लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण विद्याव्यांची नोंदणी १५ लाख ५५ हजार ०२६ इतकी होती त्या पैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन
मंत्री दादाजी भुसे यांनी ज्या विद्यार्थ्यानी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्याबरोबरच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे शिक्षक आणि माता-पिता यांचेही विशेष अभिनंदन केले. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्याबरोबरच राज्य आणि देश निश्चितच प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गायत्री पाटीलला १०० टक्के
उमरगा तालुक्यातील गायत्री पाटील हिने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यंदाच्या दहावीच्या निकालात २७९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले असून त्यामध्ये गायत्रीचाही समावेश आहे
कचरा वेचक प्रियंका कांबळे उत्तीर्ण
कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या प्रियंका कांबळे यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. कचरा वेचून घर चालविणाऱ्याा प्रियंकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिवसा कचरा वेचून रात्री अभ्यास करून तिने हे यश मिळविले आहे.
कोकण : ९७ .६२ टक्के
पुणे : ९४.२४ टक्के
नागपूर : ८९.०७ टक्के
मुंबई : ९४.९७ टक्के
कोल्हापूर : ९५.४७ टक्के
अमरावती : ९०.५० टक्के
नाशिक : ९०.५३ टक्के
लातूर : ८८.४२ टक्के
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Sanket Jadhav