म्हाडाच्या १९ व्या लोकशाही दिनात २ अर्जांवर सुनावणी
- by
- Jul 14, 2026
मुंबई : म्हाडाच्या लोकशाही दिनात पुन्हा एकदा विकासकांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. वर्षानुवर्षे हक्काच्या घरापासून वंचित राहिलेल्या एका रहिवाशाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी संबंधित विकासकाला थेट सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
म्हाडा मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या लोकशाही दिनात एकूण दोन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाचा प्रश्न म्हाडा प्रशासनासमोर मांडण्यात आला.
मुंबईतील फितवाला रोड (एल्फिस्टन रोड) येथील इमारत क्रमांक १८ या उपकरप्राप्त इमारतीमध्ये दीपक सोनावळे हे वास्तव्यास आहेत. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने संबंधित विकासकाला २००६ आणि २००९ मध्ये 'ना-हरकत प्रमाणपत्र' (NOC) दिले होते. मात्र, तब्बल दोन दशके उलटून गेल्यानंतरही विकासकाने सोनावळे यांना त्यांच्या हक्काची पुनर्वसन सदनिका दिलेली नाही.
इतकेच नव्हे तर, विकासकाने त्यांना दरमहा द्यायचे भाडेही थकवले असून, अद्याप 'कायमस्वरूपी पर्यायी निवास करार' (PAAA) देखील केलेला नाही. हक्काचे घर आणि हक्काचे भाडे या दोन्हीपासून वंचित राहिलेल्या सोनावळे यांनी अखेर न्याय मिळवण्यासाठी म्हाडाच्या लोकशाही दिनाचे दार ठोठावले.
या प्रकरणातील गांभीर्य ओळखून, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी संबंधित विकासकाला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
"पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची होणारी अडवणूक खपवून घेतली जाणार नाही. पुढील सुनावणीदरम्यान संबंधित विकासकाला तक्रारदार दीपक सोनावळे यांच्या घराची, थकीत भाड्याची आणि कराराची तात्काळ पूर्तता करण्याचे कडक निर्देश दिले जातील."
— संजीव जयस्वाल (उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा)
या सुनावणीमुळे रखडलेल्या मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमधील विकासकांच्या मनमानीला चाप बसणार असून, सोनावळे यांच्यासह शेकडो पीडित रहिवाशांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times