कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

म्हाडातर्फे राज्यव्यापी वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेला उत्साहात प्रारंभ

  • by
  • Jul 15, 2026

म्हाडातर्फे राज्यव्यापी वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेला उत्साहात प्रारंभ


पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात म्हाडाचे एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट


मुंबई, दि. १४ जुलै, २०२६ : वाढते शहरीकरण, हवामान बदल, प्रदूषण आणि तापमानवाढ या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) तर्फे राज्यभरात आयोजित वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. जुलै महिन्यात साजरा होत असलेल्या वन महोत्सव सप्ताहानिमित्त 'म्हाडा'ने राज्यभरात एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, या मोहिमेद्वारे अधिक हिरवागार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी परिसर निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. सदर मोहिमेअंतर्गत वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या आवारात 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांच्या हस्ते आज ३० बहावा वृक्षांची लागवड करण्यात आली. पंचमहाभूते फाऊंडेशन यांच्या सहकार्याने सदर उपक्रम राबविण्यात आला. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या आवारात आज जलसेवा उपक्रमही सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत मुख्यालय परिसरात चार ठिकाणी पक्षी व प्राण्यांसाठी पाण्याची भांडी तसेच अन्नपात्रे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

         यावेळी श्री. संजीव जयस्वाल म्हणाले की, साडेतीन वर्षे वयाच्या ३० बहावा वृक्षांची लागवड केल्यामुळे म्हाडा मुख्यालय इमारतीच्या आवारात पक्षी, मधमाश्या, फुलपाखरे आणि इतर परागीकरण करणाऱ्या जीवांसाठी भविष्यात नैसर्गिक निवारे निर्माण होणार आहेत. या उपक्रमामुळे म्हाडा मुख्यालय परिसरातील वृक्षांद्वारे दरवर्षी ३,००० किलोहून अधिक कार्बन डायऑक्साइड (CO₂) शोषले जाणार असून, सुमारे १५,००० किलो ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. यामुळे म्हाडा मुख्यालय परिसर हा वांद्रे परिसरातील 'ग्रीन लंग्स' म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास श्री. जयस्वाल यांनी यावेळी व्यक्त केला.

           यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंता श्री. धिरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता श्री. महेशकुमार जेसवानी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल वानखडे, वित्त नियंत्रक श्री. अजयसिंह पवार, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. उमेश वाघ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सतीश भारतीय, छत्रपती संभाजीनगर मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. वैभव केदारे, पंचमहाभूते फाऊंडेशनचे सहसंस्थापक श्री. अमित सावंत, विधी सल्लागार श्रीमती मृदुला परब, सचिव श्री. प्रफुल्ल ठाकुर, प्रकल्प व्यवस्थापन कक्षाच्या श्रीमती नीलिमा धायगुडे, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी श्रीमती सविता बोडके आदींसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

--

म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांनी सर्व विभागीय मंडळांना या वृक्षारोपण मोहिमेचे प्रभावी नियोजन करण्याच्या दिलेल्या निर्देशांची म्हाडाच्या विभागीय मंडळांनी तात्काळ प्रभावी अंमलबजावणीस प्रारंभ केला आहे. राज्यभरातील म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे.

       नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने नाशिकरोड आर्टिलरी सेंटर परिसरात आतापर्यंत १०,००० वृक्षांची लागवड केली आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातील म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पात तसेच इतर ठिकाणी वृक्षारोपणाचे नियोजन 'म्हाडा'ने केले आहे.

      म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने तळीये, खोणी, शिरढोण, भंडार्ली, गोठेघर, कोहोज कुंठवली, भिवंडी येथील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये आतापर्यंत सुमारे ४००० वृक्षांची लागवड केली आहे.

       पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने पुणे जिल्ह्यातील कोंढवा, बिबडेवाडी, लोहेगाव (हवेली), दौंड, दिवे, निरगुडसर, सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे, कागल (जि. कोल्हापूर) येथील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत सुमारे ३००० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

       नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने वृक्षारोपण मोहीमेला प्रारंभ केला असून वडधामना व म्हाडा सिटी गृहनिर्माण प्रकल्पात आतापर्यंत सुमारे १००० वृक्षांची लागवड केली आहे.

       छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने नक्षत्रवाडी येथील गृहनिर्माण प्रकल्पात ५०० वृक्षांची लागवड करून वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ केला आहे. येत्या आठवड्यात मंडळातर्फे विविध गृहनिर्माण प्रकल्पात सुमारे १०,०५० झाडे लावण्यात येणार आहेत.

       मुंबई मंडळाने सुमारे ४००० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवले असून आतापर्यंत सुमारे ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

श्री. संजीव जयस्वाल यांनी सर्व विभागीय मंडळांना दिलेल्या निर्देशांनुसार या मोहिमेत स्थानिक परिस्थितीला अनुरूप, पर्यावरणपूरक, देशी प्रजातींची, फळझाडांची, ५ ते ६ फूट उंचीची आणि २ ते ३ वर्षे वयोमानाची निरोगी रोपे लागवड करण्यास प्राधान्य दिले जात आहे. अधिक टिकावू वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, कार्बन शोषण क्षमता वाढविणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

       म्हाडाने गेल्या वर्षापासून पर्यावरण संवर्धनाला आपल्या सामाजिक बांधिलकीचा अविभाज्य भाग मानले आहे. मागील वर्षी राज्यभरात सुमारे दीड लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ऐंशी टक्के वृक्ष आजही अस्तित्वात असून त्यांचे संवर्धन केले जात आहे. यामधील सुमारे १,१४,८०० झाडांचे यशस्वी जिओ-टॅगिंग देखील करण्यात आले आहे. ही बाब वृक्षसंवर्धनाच्या दिशेने म्हाडाच्या प्रयत्नांचे यश दर्शविते.

       या वर्षीच्या मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, रहिवासी कल्याण संघटना (RWA),गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO), पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संघटना तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील बांधकाम अथवा विकासासाठी अनुपयुक्त असलेल्या म्हाडाच्या भूखंडांची ओळख पटवून त्या ठिकाणी मियावाकी पद्धतीने घनदाट शहरी वनांची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. कमी जागेत अधिक वृक्षसंख्या आणि समृद्ध जैवविविधता निर्माण करण्यासाठी ही पद्धत प्रभावी ठरत असून शहरी भागातील हरित क्षेत्र वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.

       तसेच म्हाडाच्या गृहनिर्माण वसाहती, मोकळे भूखंड, सार्वजनिक जागा आणि प्रकल्प परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीचे नियोजन करताना भविष्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि इमारतींच्या सुरक्षिततेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लागवड करण्यात येणाऱ्या प्रत्येक वृक्षाचे जिओ-टॅगिंग करण्यात येणार असून त्याद्वारे वृक्षांच्या वाढीचा आणि संवर्धनाचा नियमित आढावा घेता येणार आहे. तसेच झाडांच्या दीर्घकालीन देखभाल आणि संगोपनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्था, स्थानिक गृहनिर्माण संस्था, रहिवासी संघटना आणि समुदाय गटांना सोपविण्याचा विचार करण्यात येत आहे. यामुळे वृक्षारोपण उपक्रमाला दीर्घकालीन शाश्वतता प्राप्त होईल.

         म्हाडाच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधील रहिवाशांचा सहभाग वाढवून प्रत्येक वसाहतीत हरित क्षेत्र विकसित करण्याचा मानस असून, खासगी जागांवर जमीनमालकांच्या संमतीने फळझाडे लावण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे स्थानिक स्तरावर पर्यावरण संरक्षणाबाबत मालकीची भावना निर्माण होऊन वृक्षांचे संगोपन अधिक प्रभावीपणे होईल.

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट