प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- by
- Jul 14, 2026
वसई रेल्वे स्थानकात जाहिरात फलकाचे लोखंडी पत्रे निखळले
वसई :- वसई रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरून बाहेर प्लाण्याच्या मार्गावर असलेला जाहिरात फलकाचा सांगाडा गंजलेल्या अवस्थेत असल्यामुळे तसेच त्याचे लोखंडी पत्रे निखळले असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षितलेला धोका निर्माण झाला आहे. तसेच हा लोखंडाचा सांगाडा कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
वसई विरार शहरात बाजारपेठ वर्दळीचे रस्ते, रेल्वे स्थानके आणि बस आगरांच्या आवारात जाहिरातीच्या फालकांसाठी मोठमोठे लोखंडी सांगाडे उभारण्यात आलेले आहेत. खाजगी कंपन्या, विकासक तसेच सरकारी योजना आणि प्रकल्प यांची माहिती देणाऱ्या विविध प्रकारच्या जाहिराती या जाहिरात फलकांवर झळकलेल्या पाहायला मिळतात. मात्र, यापैकी अनेक जाहिरात फलक गंजलेल्या, वाकलेल्या अवस्थेत आढळून येतात. या अशा धोकादायक जाहिरात फलकांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वसई रेल्वे स्थानक परिसरात देखील अशाच एका जाहिरात फलकाच्या सांगाड्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, फलाट क्रमांक दोनवरून बाहेर पडण्याच्या मार्गावरच १० ते १२ फूट उंच जाहिरात फलकाचे सांगाडे उभारण्यात आले आहेत है सांगाडे करहीशा गंजलेल्या अवस्थेत असून या फलकांवर असलेले लोखंडी आणि धारधार पत्रे काहीसे निखळे आहेत. तसेच वादळी वाऱ्यासह अनेकदा है अर्धवट निखळलेले लोखंडाचे पत्रे वेगाने हलत असल्याचे देखौल काही प्रवाशांनी सांगितले. दुचाकीचे वाहनतळ आणि पुढे काही अंतरावर असणारा रिक्षायांचा चामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे बहुतांश प्रवासी या मार्गावरून ये-ज करतात. त्यामुळे लोखंडी सांगाडधाचर अर्थातरी लटकत असलेला एखादा पत्रा जर एखाद्या प्रवाशांवर कोसळला तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे प्रशासनाने या बोकादायक पाहणी करून किमान या लोखंडी सांगाड्यावरील धोकादायक पर्ने तरी हटवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times