कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

वसई-विरारमध्ये पूर ओसरताच महापालिका अॅक्शन मोडमध्ये

  • by
  • Jul 14, 2026


साथरोग नियंत्रणासाठी ४१६ वैद्यकीय पथके तैनात

वसई: मागील आठवडचात वसई-विरार शहरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांच्या घरातही पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर आता शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे, ही संभाव्य रोगराई रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग सज्ज झाला असून युद्धपातळीवर आरोग्य तपासणों आणि उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शहरात साथरोगांधा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध भागांत विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे.

आतापर्यंत ३१ आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून, याद्वारे नागरिकांना 'डॉक्सीसाइक्लीन' या लॅप्टोस्पायरोसीस प्रतिबंधक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांशिवाय दिवस-रात्र सेवा देणारे महानगरपालिकेचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठीही विशेष

६४ हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण

साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने एकूण ४१६ विशेष पथके कार्यान्वित केली आहेत. ही पथके प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि संशयित रुग्णांची तपासणी करत आहेत

आतापर्यंत ६४, ८२१ घरांना भेटी देण्यात आल्या असून, ताप व इतर लक्षणे आढळलेल्या १,१२१ जणांचे रक्त नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

आरोग्य शिबिरे आयोजित करून औषध वाटप करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

पूरपरिस्थिती आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेची सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर यांची वेळ वाढवण्यात आली आहे. आता ही केंद्रे सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

डेंग्यू-मलेरिया रोखण्यासाठी कंटेनर तपासणी पावसानंतर साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत पाणी साठलेल्या जागांची आणि कंटेनरची कसून तपासणी केली जात आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना आणि औषध फवारणीही केली जात आहे.

नागरिकांच्या सेवेसाठी खुली राहणार आहेत. नागरिकांना आरोग्याची कोणतीही समस्या, ताप किंवा अंगदुखी जाणवल्यास त्यांनी अंगावर न काढता त्वरित जवळच्या महापालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट