मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात वृक्षारोपण व रक्तदान शिबीर
- by
- Jul 18, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात वृक्षारोपण व रक्तदान शिबीर
सानपाडा ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संदिप नाईक प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आणि भाजपा सानपाडा मंडळ आयोजित सानपाडा येथील बाबू गेनू मैदानात वृक्षारोपण सोहळा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाला सुरुवात झाली. लागवड केलेली सर्व झाडे बहरू दे आणि त्यांच्या फळा-फुलांचा सुगंध चहुबाजूंना पसरु दे, मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राप्रती असलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, हे मागणे यानिमित्ताने मागण्यात आले. तसेच यानिमित्ताने सानपाडा वसाहतीतील नागरिकांना छत्र्या देखील भेट देण्यात आल्या. या उपक्रमास माजी आमदार संदीप नाईक हे उपस्थित होते.
सानपाडा विभागातील नगरसेवक सुनील कुरकुटे, भाऊ भापकर, निशांत भगत, नगरसेविका शैला पाटील, शिल्पा ठाकुर, सानपाडा ज्येष्ठ नागरिक सेवा समितीचे सदस्य, महिला भगिनी आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
आपल्या ज्येष्ठ नेत्याप्रती आदर आणि निसर्गाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांस जनसेवेसाठी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना केल्याचे उपमहापौर भगत यांनी म्हटले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble