४ तास. एक भव्य गर्डर लाँचर.
- by
- Jul 22, 2026
मुंबईच्या नव्या हाय-स्पीड मार्गाच्या दृष्टीने आणखी एक मोठा टप्पा पार
मुंबई : एमएमआरडीएने १३.९ किमी लांबीच्या उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत (छेडा नगर ते आनंद नगर) गजबजलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर सेगमेंट लाँचरचे प्रत्येकी ५९ मीटर लांबीचे आणि १६० मेट्रिक टन वजनाचे मुख्य गर्डर लाँचरचे दोन भाग यशस्वीरित्या उभारत आणखी एक महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.ही संपूर्ण जटिल प्रक्रिया करण्यासाठी १८ ते २४ तासांचा कालावधी लागतो ते काम अवघ्या ४ तासांत पूर्ण करण्यात आलं.उत्कृष्ट नियोजन, काटेकोर सुरक्षा उपाययोजना आणि एमएमआरडीए व मुंबई वाहतूक पोलिसांमधील समन्वयामुळे ही कामगिरी यशस्वीपणे पूर्ण झाली.
आता पुढे काय?
मुख्य गर्डर लाँचरची उभारणी पूर्ण झाल्यानंतर सेगमेंट लाँचरद्वारे आता १,६३२ प्रीकास्ट सेगमेंट्सची टप्प्याटप्प्याने उभारणी केली जाणार आहे. प्रत्येक सेगमेंटचे वजन सुमारे ९० मेट्रिक टन असून त्याद्वारे २५ मीटर रुंदीच्या सिंगल-सेल सेगमेंट सुपर स्ट्रक्चरची उभारणी केली जाईल. यामुळे व्हायाडक्टच्या बांधकामाला वेग मिळून प्रकल्प पुढील महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करेल.
आणि मुंबईसाठी याचा अर्थ काय?
पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्प म्हणजे आनंद नगर, ठाणे ते छेडानगर, घाटकोपर यांना जोडणारा १३.९ किमी लांबीचा, पूर्णपणे उन्नत ६-पदरी हाय-स्पीड कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर आनंद नगर पासून मुलुंड, ऐरोली, जेव्हीएलआर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर मार्गे जाईल आणि शेवटी छेडानगर येथे संपेल. पूर्व द्रुतगती महामार्गावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्यामुळे नियंत्रण होण्यास मदत होऊन प्रवास अधिक वेगवान आणि विश्वासार्ह होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास हा अवघ्या २५-३० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक वेगवान होण्यासोबतच मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक सक्षम होईल.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times