सहकाराच्या नव्या पर्वाचा प्रारंभ; महाराष्ट्रात ‘भारत टॅक्सी’चा शुभारंभ!
- by
- Jul 24, 2026
नवी मुंबई : महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रात ‘भारत टॅक्सी’ या देशातील पहिल्या सहकारी टॅक्सी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सहकाराची पंढरी असलेल्या महाराष्ट्राच्या भूमीतून सुरू झालेला हा उपक्रम राज्यातील लाखो टॅक्सी चालकांसाठी स्वाभिमान, स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाची नवी दिशा ठरणार आहे.
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीतून स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना झाली आणि केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा.श्री. अमितभाई शाह जी यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्राने अभूतपूर्व परिवर्तन अनुभवले. ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेला महाराष्ट्रात मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातून नवी ऊर्जा मिळाली असून, ‘भारत टॅक्सी’ हा त्याच परिवर्तनाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
गेल्या पाच वर्षांत देशातील सहकार क्षेत्राचा कायापालट झाला आहे. गावच्या सोसायट्यांचे संगणकीकरण, नव्या राष्ट्रीय सहकारी संस्था, सहकार विद्यापीठ, शेतकरी ते ग्राहक अशी मूल्यसाखळी आणि आता शहरातील टॅक्सी चालकांना सहकाराच्या मुख्य प्रवाहात आणणारा ‘भारत टॅक्सी’ उपक्रम सहकाराची व्याप्ती अभूतपूर्वपणे वाढवणारा आहे. आतापर्यंत ‘भारत टॅक्सी’शी ७.८२ लाख नोंदणीकृत सारथी, ४१.१२ लाख ग्राहक जोडले गेले असून, दररोज ११,०४८ फेऱ्या होत आहेत. या माध्यमातून सारथींना आतापर्यंत ₹७६.९४ कोटींचे उत्पन्न थेट त्यांच्या खात्यात जमा झाले आहे.
‘भारत टॅक्सी’ची सर्वात मोठी ताकद म्हणजे ‘चालक हाच मालक’ ही संकल्पना. या उपक्रमात चालकाला केवळ रोजगार नाही, तर सहकारी संस्थेतील सदस्यत्व, प्रतिनिधित्व, लाभांशाचा हक्क आणि प्रवाशांकडून मिळणारी रक्कम थेट त्याच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होऊन चालकांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांना सन्मानाने, स्वावलंबीपणे व्यवसाय करता येईल.
यावेळी महाराष्ट्राचे सहकार मंत्री मा.श्री. बाबासाहेब पाटील, लोकनेते श्री. रामशेठजी ठाकूर, आमदार श्री. महेशजी बालदी, आमदार श्री. प्रशांतजी ठाकूर, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महाराष्ट्राचे सहकार सचिव श्री. प्रवीणजी दराडे, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री. रमणजी कुमार, महाराष्ट्राचे सहकार आयुक्त श्री. दीपकजी तावरे, सहकार टॅक्सीचे चेअरमन डॉ. जयेनजी मेहता, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मंगेशजी वाकडीकर, श्री. सौरभ राव, श्री. अविनाश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times