राज्य पंच शिबिरातून घडणार खो-खोच्या नव्या युगाची पायाभरणी!, २२-२३ ऑगस्टला कराडमध्ये राज्य पंच शिबिर
- by
- Aug 01, 2026
उपस्थित राहणाऱ्या पंचांनाच राज्य स्पर्धांसाठी मिळणार नियुक्ती
मुंबई: महाराष्ट्रातील खो-खोचा दर्जा अधिक चाचण्यासाठी आणि राज्यातील पंचगिरी अधिक सक्षम, शिस्तबद्ध व आधुनिक करण्याच्या दिशेने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने पाऊल उचलले आहे. २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी कराड येथे होणारे राज्य खो-खो पंच शिबीर है केवळ प्रशिक्षण शिबीर नसून, आगामी राज्य स्पर्धामाध्ये पंच म्हणून संधी मिळविण्याचे प्रवेशद्वार ठरणार आहे. विशेष म्हणजे, या शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्या पंधांनाच आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धासाठी नियुक्ती दिली जाणार असल्याने राज्यभरातील पंचांमध्ये या शिबिराबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे पंचगिरीत गुणवत्ता आणि शिस्तीवर भर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा.डॉ. इंद्रजीत जाधव यांनी ही माहिती देताना सांगितले की, राज्यातील पंचांना नियमांतील अद्ययावत बदल, निर्णयक्षमतेतील अचूकता आणि स्पर्धातील व्यावसायिकता यांचा अनुभव देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. द अॅमेच्युर खो-खो असोसिएशन, सांगली आणि रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य आणि राष्ट्रीय पात्र पंचांना सुवर्णसंधी
या शिबिरासाठी सर्व जिल्हा खो-खो संघटनांअंतर्गत कार्यरत असलेले तसेच राज्य किंवा राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व पंच पात्र असणार आहेत. पंचगिरीची गुणावता अधिक ऊंचावण्यासाठी आणि राज्यभर एकसमान निर्णयप्रक्रिया विकसित करण्याच्या उद्देशाने या शिबिराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्र पंचांनी या संधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन असोसिएशन करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी अनिवार्य: मुदत १५ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे आवाहनशिबिरात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून, नोंदणी केलेल्या पंचानाच प्रवेश दिला जाणार आहे. नौदणीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ : ०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
शिबिराचे वेळापत्रक
स्थळ: स्यत शिक्षण संभीचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज , कराड
दिनांक: २२ व २३ ऑगस्ट २०२६
उपस्थितीची वेळ २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०० वाजता
संपर्कासाठी
शिबिराबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक पंचांनी डी. प्रशांत इनामदार (९७५२८९७३७३/७७०९१७३७६७) किवा प्रा. सचिन चव्हाण (९९२३२१५००७) यांच्याशी संपर्क साधावा, असे असोसिएशन तर्फे कळविण्यात आले आहे
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times