वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

गरीब शेतकरी कुटुंबातून भारतीय सैन्य दलापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास;

  • by
  • Aug 03, 2026

 २२ वर्षांच्या देशसेवेनंतर रूपेश गायकवाड यांचा गौरवपूर्ण सत्कार.

माणगाव :  माणगाव तालुक्यातील देगाववाडी येथील गरीब शेतकरी दिलीप गायकवाड यांचे  सुपुत्र रूपेश दिलीप गायकवाड यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल २२ वर्षे अविरत व निष्ठेने देशसेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झाले. बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत असलेल्या गायकवाड यांच्या गौरवपूर्ण सेवेचा सन्मान करण्यासाठी माणगाव शहरातील गांधी हॉल येथे रविवारी दि. २ ऑगस्ट रोजी  भव्य सेवानिवृत्ती व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
  रूपेश गायकवाड यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. चार भावांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असताना आई-वडिलांनी काबाडकष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण दिले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रूपेश गायकवाड यांनी भारतीय सैन्य दलात प्रवेश मिळवला आणि देशसेवेचे स्वप्न साकार केले.
 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून त्यांनी २२ वर्षे विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत राष्ट्रसेवेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रामाणिक सेवेमुळे त्यांनी सहकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. आपले मनोगत व्यक्त करताना निवृत्त सैनिक रूपेश गायकवाड म्हणाले की, मी जरी शासन नियमाप्रमाणे सेवेतून निवृत्त होत असलो तरी, आजही देशसेवा ह्या शरीरातील नसा- नसा मध्ये भिनलेली आहे आणि यापुढेही इतर सेवेतून मी देशसेवा करण्याचा प्रयत्न करेन. आणि आजच्या युवा पिढीने देखील आयुष्यातील काही वर्ष तरी देशसेवेसाठी समर्पित करावी असे प्रेरणादायी मत देशातील युवकांसाठी व्यक्त केले.
  माणगाव मधील गांधी मेमोरियल हॉल येथे झालेल्या सत्कार सोहळ्यास रुपेश गायकवाड यांचे कुटुंबीय, नातेवाईक, माणगाव व तळा तालुका मराठा समाजाचे पदाधिकारी,माजी सैनिक, देगाववाडी मित्र मंडळ, ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आई-वडील, तीन भाऊ व त्यांचे कुटुंब,सासू-सासरे, पत्नी, आत्यभाऊ दिपक मोरे, दीप्ती मोरे व त्यांचे कुटुंब नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. उपस्थितांनी त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
 कार्यक्रमात अनेकांनी रूपेश गायकवाड यांच्या संघर्षमय वाटचालीचा गौरव करत, गरीब शेतकरी कुटुंबातून भारतीय सैन्य दलात हवालदार पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. राष्ट्रसेवा हीच सर्वोच्च सेवा असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट