कामोठ्यात छत कोसळण्याच्या घटनांत वाढ; एकाचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी
- by
- Aug 05, 2026
पनवेल : कामोठे परिसरात इमारतींचे छत कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आतापर्यंत परिसरात छत कोसळण्याच्या चार घटना घडल्या असून, त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, कामोठ्यातील धरती व्हिला सोसायटीत देखील छताचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. सोसायटीतील अनेक घरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून छताला मोठ्या प्रमाणात गळती होत होती. त्यानंतर छताचा भाग कोसळल्याने इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याशिवाय, सोसायटीच्या मागील खाडी परिसरात साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक विकास घरत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इमारतीची तातडीने तपासणी करण्यास, परिसराची स्वच्छता करण्यास, खाडी परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई करण्यास तसेच साप व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
कामोठ्यात वारंवार घडणाऱ्या छत कोसळण्याच्या घटनांमुळे जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्ती किंवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times