सोनखार -सानपाडा येथे माजी आमदार संदिप नाईक यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
- by
- Jul 31, 2026
सोनखार -सानपाडा येथे माजी आमदार संदिप नाईक यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.
ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार व नवी मुंबईकर जनतेचे विश्वासाहर्य युवा नेतृत्व संदीप नाईक यांच्या ४ ऑगस्ट रोजी असलेल्या जन्मदिनानिमित्ताने प्रभाग क्र. १८ मधील भारतीय जनता पक्षाच्या निशांत भगत व सौ प्रिती संदीप भगत या नगरसेवकांच्या पुढाकाराने नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांना शासनाच्या थेट लाभ मिळणाऱ्या सेवा ज्यामध्ये जेष्ठ नागरिकांना शासनाचे जेष्ठ नागरिक सवलत ओळखपत्र, नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस मधून मोफत प्रवास सवलत कार्डचे वाटप करण्यात येणार आहे, सोबतच प्रभागातील १० वी वर १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, SIR मोहिमेत नागरी सेवेतील शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या निवडणूक विभाग नियुक्त BLO चां तसेच प्रभागातील सानपाडा - सोनखार (पामबीच) मधील सर्व सोसायटीनिहाय असलेल्या समन्वयक यांचा
सन्मान या निमित्ताने करण्यात येणार असल्याचे उपक्रमाचे संयोजक संदीप करसन भगत यांनी कळविले आहे.
मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायं.५ ते ७ वाजता अँम्फी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सेक्टर १ ते १५, ब्रीजखाली, सोनखार, सानपाडा-पामबीच येथे आयोजित या उपक्रमात जेष्ठ नागरिक, BLO आणि सोसायटी समन्वयक यांना उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
या कार्यक्रमास नगरसेविका दयावती संपत शेवाळे, माजी नगरसेविका श्रीमती फशीबाई करसन भगत, सौ वैजयंती दशरथ भगत व रुपाली निशांत भगत हे उपस्थित राहणार आहेत असे आयोजक नगरसेवक निशांत भगत व नगरसेविका प्रिती संदीप भगत यांनी सांगितले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble