वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • by
  • Aug 07, 2026

मुंबई : गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकस समूहाच्या अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी सांगितले की, भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. प्राइम फोकसचा हा स्टुडिओ त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून, त्यामुळे मुंबई जागतिक सर्जनशील उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगभरातील मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांना सेवा देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेली ही सुविधा महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. 'वेव्ह्स 2025' परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, शासनाने यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले आहे.

भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासामध्ये असंख्य प्रेरणादायी कथा दडल्या असून, त्या जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम सर्जनशील परिसंस्था आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्राइम फोकसची ही सुविधा भारताच्या सर्जनशील क्षमतेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी प्रकल्पाचे कौतुक करत संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी संगम या स्टुडिओच्या माध्यमातून साकार झाल्याचे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'ऑरेंज इकॉनॉमी' संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्याचे काम प्राइम फोकसने केले असून, सर्जनशीलता, सांस्कृतिक समृद्धी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणारा हा उपक्रम देशासाठी नवे मानदंड निर्माण करेल, असे ते म्हणाले.

उद्घाटन समारंभाला केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रपट नगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील तसेच प्राइम फोकस समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जगातील सर्वात मोठ्या चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेल्या 'रामायण' चित्रपटाची निर्मिती या स्टुडिओमध्ये होत असल्याचा विशेष उल्लेख केला. भारतीय सर्जनशीलतेचा जागतिक स्तरावरील उत्कृष्ट नमुना म्हणून हा चित्रपट ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युवा पिढीच्या सर्जनशील क्षमतेला प्रोत्साहन देणे, मनोरंजन उद्योगात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि फिल्मसिटीचे जागतिक दर्जाच्या सर्जनशील व मनोरंजन केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या उद्देशाने फिल्मसिटीच्या व्यापक पुनर्विकासाचा आराखडाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट