सिंधुदुर्गातील अवैध प्लॉटिंगवर कारवाई; विशेष तपास पथकाचा अहवाल लवकरच : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- by
- Aug 07, 2026
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ले आदी भागांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध जमीन खरेदी-विक्री आणि बेकायदेशीर प्लॉटिंगच्या प्रकरणांची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून, अनियमिततेचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदेशीर जमीन व्यवहारांच्या चौकशीसाठी नियुक्त समितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मंत्री नितेश राणे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच संबंधित अधिकारी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, शेतजमिनीचे बेकायदेशीरपणे निवासी भूखंडांमध्ये रूपांतर होऊ नये यासाठी जमीन खरेदी-विक्रीची सर्व कागदपत्रे काटेकोरपणे तपासली जातील. परराज्यातील व्यक्ती शेतजमीन खरेदी करत असल्यास त्यांच्या कागदपत्रांची केंद्रीय समितीच्या समन्वयाने पडताळणी करण्यात येईल.
शेतीसाठी असलेली जमीन निवासी वापरासाठी बेकायदेशीरपणे वापरली जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोणतेही वैध दस्तऐवज नसताना जमीन व्यवहार, अनधिकृत प्लॉटिंग किंवा नियमबाह्य विकास आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या कारवाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध प्लॉटिंगला आळा बसण्याबरोबरच नियमबाह्य जमीन व्यवहारांवर नियंत्रण येण्यास मदत होईल. तसेच जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने होण्यासाठी शासन आवश्यक ती पावले उचलत असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times