मिसिंग लिंक बोगद्यात अंगावर काटा आणणारा अपघात भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला धडक,थरार CCTV मध्ये कैद
- by
- Aug 07, 2026
मुंबई : पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात भरधाव फॉर्च्युनरची पिकअप टेम्पोला धडक दिल्याचा थरार अपघात शुक्रवारी मध्यरात्री घडला आहे.या अपघातात या अपघातातात तुषार भूमकर (रा.वाकड ) यांचा मृत्यु झाला आहे.अपघात एवढा भीषण घडला आहे की तो CCTV मध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तुषार भूमकर (रा.वाकड ) हा तरूण आपल्या मित्रांबरोबर मुंबईत मरीन ड्राव्हई येथे रात्रीच्या वेळी जात असताना मिसिंग लिंगच्या दुसऱ्या फॉर्च्युनर कार एम.एच.14 एमजी 000 -7 कारच्या वेगावरील नियंत्रण सुटला असता समोरील मालवाहू टेम्पो एम.एच 01 सी आर 7075 ला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की फॉर्च्युनरचा चक्काचूर झाला.अपघातात एकाचा मृत्यु झाला असून एक जण गंभीर जखमी तर तीन जखमी झाले आहेत.बोगद्यात बचाव यंत्रणा वेळेवर पोहचले नसल्यामुळे तब्बल दोन तास वाहतुक बंद ठेवत जुन्या महामार्गावरून वळविण्यात आली.महामार्ग पोलीस, आयआरबी पथक देवदूत आणि मदत यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केली आहे.
मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यावश्यक सेवा सुविधा बोगद्यात उपलब्ध करून दिली अशी माहिती दिली होती.परंतु बोगद्यात मोबाइल सेवा नसल्यामुळे अपघातग्रस्तांना संपर्क करणे होत असून मिसिंग लिंकच्या बोगद्यातील सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दररोज छोटे आपघात घडतात यावेळी आम्ही तातडीने मदतकार्य करीत असतो आता नव्याने मिसिंग लिंक सुरू झाला आहे याठिकाणीही अपघाता घडल्यास आम्ही मोफत मदतकार्य करू फक्त आम्हाला येण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी वाहतुक संघटनेचे अध्यक्ष अरूण म्हामुणकर यांनी करीत मिसिंग लिंगवर सध्या एकच क्रेन आहे त्यामुळे अपघातग्रस्त वाहन बाजूला करताना आडचण येवू शकते.त्यामुळे आमच्याकडे पाच ते सहा क्रेन उभे आहेत एक मिनिटात अपघातस्थळी मदतकार्य करू असेही म्हामूणकर यांनी बोलताना सांगितले आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times