Breaking News
बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या कलावंत कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्य स्पर्धा भरवीत असते. यंदाचे या स्पर्धेचे 53 वे वर्ष होते. यावर्षी बा. य. ल. नायर धर्मदाय रुग्णालय तर्फे सादर झालेल्या 'कायाप्पा चा पाडा' या नाटकाला 'सर्वोत्कृष्ट नाट्य प्रयोग प्रथम' पारितोषिक प्राप्त झाले. या व्यतिरिक्त या नाटकासाठी आठ वैयक्तिक पारितोषिकही प्राप्त झाले आहे. . सदर नाटक श्री देवेंद्र मधुकर काळसेकर (स्वतः नायर रुग्णालय कर्मचारी) यांनी लिहिले आहे व नाटकाचे दिग्दर्शन नम्रता देवेंद्र काळसेकर यांनी केलेले आहे. यासाठी दिग्दर्शनाचे सर्वोत्कृष्ट द्वितीय पारितोषिक त्यांना प्राप्त झाले. ही दोघं Radiation Oncology विभागात Radio Therapist ह्या हुद्यावर कार्यरत आहेत. सर्व तांत्रिकी प्रथम पारितोषिक प्राप्त करून नायर रुग्णालयाने या स्पर्धेत भरघोस यश मिळवले आहे. नायर नाटक मंडळ, यात अगदी कामगार पासून ते clerical स्टाफ, सिस्टर्स, नर्सेस, लॅब टेक्निशन, डॉक्टर, असोसिएट प्रोफेसर ते अगदी विभाग प्रमुख असे सर्व कर्मचारी एकत्रितपणे येऊन काम करतात. नाटक ही त्यांची फक्त आवड नसून वेड आहे आणि त्यामुळे आपल्या अतिशय जोखमीच्या व व्यस्त अशा कामकाजातून ही तालमीसाठी आपले कार्यालयीन वेळ संपल्यानंतर ते सवड ही काढतात. गेली तीन-चार वर्ष नायर रुग्णालय तर्फे सादर झालेल्या नाटकांनी पहिल्या तीन क्रमांकात आपले स्थान मिळवले आहे व अनेक वैयक्तिक पारितोषिके प्राप्त केलेली आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत ही त्यांना अनेकदा यश मिळाले आहे. गेल्या वर्षी त्यांनी सादर केलेले नाटक 'धनंजय माने येथे राहतात का?' (लेखिका- रूपाली मिलिंद पवार नायर रुग्णालय कर्मचारी ) याला सर्वोत्कृष्ट द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले व प्रेक्षक प्रतिसादामुळे याचे स्पर्धेनंतर प्रायोगिक रंगभूमीवर पदार्पण झालेले आहे. नायर संघाने त्याचे आतापर्यंत मुंबई व मुंबई बाहेर असे 11 प्रयोग सादर केलेले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times