“एका क्लिकने आत्मविश्वास वाढला”; रेवदंड्यात ज्येष्ठ नागरिकांची डिजिटल दुनियेशी यशस्वी मैत्री
रेवदंडा :- बदलत्या डिजिटल युगात ज्येष्ठ नागरिकांनाही तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने रेवदंडा येथे दोन दिवसीय मोफत स्मार्टफोन साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र भारत (ILC-I) या संस्थेच्या वतीने १८ व १९ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणात स्मार्टफोनचा सुरक्षित व प्रभावी वापर, विविध उपयुक्त ॲप्स, जीमेल, सोशल मीडिया तसेच ऑनलाइन सेवांचा वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान प्रोग्राम ऑफिसर सुशांत सोनावणे, नंदकुमार सकट आणि विलास शिंदे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सहभागी ज्येष्ठांना तंत्रज्ञानातील बारकावे समजावून सांगितले. याशिवाय वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन फसवणूक, बनावट ई-मेल, फिशिंग आणि आर्थिक व्यवहारांमधील सुरक्षेच्या उपायांबाबतही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
स्मार्टफोन वापरताना जागरूकता आणि सावधगिरी किती आवश्यक आहे, याची जाणीव या प्रशिक्षणातून ज्येष्ठ नागरिकांना झाली. दोन दिवसांच्या या उपक्रमातून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्याची भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केली. या प्रशिक्षणाचा लाभ ४० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. यावेळी अलका देवधर, सरोज वरसोलकर, सुरेश खडपे, शरद वरसोलकर आणि मंगेश वडके यांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रकाश पाटील यांनी संस्थेचे तसेच मार्गदर्शकांचे आभार मानत अशा उपक्रमांची भविष्यातही आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. डिजिटल युगात तंत्रज्ञानाशी मैत्री करत आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश देणारा हा उपक्रम रेवदंड्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
नितेश नारायण राणे
- जन्मदिन
- June 23
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times