प्रामाणिकपणाचा आदर्श, १ लाखाची रोकड केली पोलिसांना स्वाधीन
- by
- Jul 18, 2026
प्रामाणिकपणाचा आदर्श, १ लाखाची रोकड केली पोलिसांना स्वाधीन
नवीन लाड याचे सर्वत्र कौतुक
मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि भौतिकवादी युगात प्रामाणिकपणा जपणाऱ्या व्यक्तींचे कौतुक करणे गरजेचे आहे. अशीच एक अभिमानास्पद घटना नुकतीच समोर आली आहे, नवीन लाड हे अँन्टाॅप हिल येथून सायंकाळी कामावरून घरी येत असताना त्याला अमर महल उड्डाणपूलजवळ पैशानी भरलेली पिशवी पडलेली दिसली. त्याने गाडी थांबवून ती पिशवी उचलली. त्यात जवळपास १ लाख रुपयांची रोकड होती. नवीन लाड याने तत्काळ नेहरूनगर पोलीस ठाणे गाठून ती पैशाची पिशवी परत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नविन लाड हे आपले कार्यालयीन काम आटोपून बाईकने घरी परतत होते. दरम्यान, चेंबूर येथील पुलाजवळ रिमझिम पाऊस सुरू असताना त्यांना रस्त्यावर १ लाख रुपयांची मोठी रोकड पडलेली दिसली. कोणताही लोभ न धरता, त्यांनी तत्परता दाखवून ती रोकड सुरक्षितपणे गोळा केली. यावेळी त्यांना वाहतूक पो. कॉ. सुशांत सदाशिव हुजरे (नेहरू नगर पोलिस स्टेशन) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नविन लाड यांनी नेहरू नगर पोलीस ठाणे गाठले. तिथे पोलीस पो.नि.तुकाराम निसरड व सपोनि पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व रक्कम रीतसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी साक्षीदारांचीही मदत घेण्यात आली.
ज्या व्यक्तीचे हे पैसे हरवले आहेत, त्यांनी योग्य त्या पुराव्यांसह नेहरू नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नविन लाड यांच्या या निस्वार्थी आणि प्रामाणिक कृत्यामुळे भालगावसह संपूर्ण रोहा तालुक्यातून आणि त्यांच्या मित्रपरिवारातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबईसारख्या शहरात दाखवलेल्या या प्रामाणिकपणाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
ROHAN RASAL