वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

सेवेशी ठाई तत्पर, प्रमोदशेठ म्हसकर, प्रतिष्ठानच्या वतीने कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाखालील खड्डे बुजविले.

  • by
  • Aug 04, 2026

रोहा :- मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाखालील तसेच सर्व्हिस रोडवर भयानक झालेल्या पावसामुळे मोठ मोठे खड्डे पडले असून यात अपघात होत होते मात्र सदरील ठेकेदार आणि अधिकारी वर्गाला काही ही घेणे देणे नाही मात्र येतील प्रवासी वर्गाचा अथवा नागरिकांचा कोणताही अपघात होऊ नये याची तात्काळ दखल घेत कोणतेही पद, सत्ता नसताना सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारा खरा लोकनेता म्हणजे प्रमोद शेठ म्हसकर यांनी त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून रखडलेल्या कोलाड आंबेवाडी नाका रहदारीच्या मार्गावरील पडलेले खड्डे बुजवून पुन्हा एकदा एक समाजाप्रती वेगळा आदर्श निर्माण केला आहे.तर वृत्त पत्राने तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा यामुळेचे हा संदेश एका सामाजिक आणि लोकाभिमुख कार्यकर्त्यांपुढे गेला आणि त्याचे उत्तम उदाहरण आज या कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाखाली भयानक पडलेले खड्डे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आला असून प्रमोद शेठ म्हसकर यांचे विशेष कौतुक होत असून वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या तसेच त्यांच्या प्रतिनिधींचे देखील येथील जनतेतून आभार मानले जात आहेत.




गेली अनेक दिवसांपासून या उड्डाण फुलाखाली भले मोठे जीवघेणे खड्डे पडले होते तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला असणारे सर्व्हिस रोड हे देखील पूर्णतः खड्ड्यांमुळे निकामी झाले होते.यावर उपाय योजना कराव्या यासाठी अनेकांनी ठेकेदार आणि सदरील अधिकारी यांना सोशल मीडियावर आणि वृत्त पत्राच्या माध्यमातून विणविण्या केल्या मात्र यावर नेहमी प्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून कानाडोळा.तर मागील दोन दिवसांत अधिक हे खड्डे भयानक झाल्याने दुचाकी चारचाकी वाहन अडकून राहत होती तसेच एक प्रवासी बस या खड्ड्यातून कलंडता कलंडता बचावली हे दृश्य तर भयानक पाहून अनेकांच्या जीवाची धाकधूक तर पादचारी वर्गाला देखील जीव मुठीत धरून जा ये करावे लागत होते.अत्यंत दयनीय अवस्था येथील सर्व्हिस रस्त्याची आणि उड्डाण फुलाखाली झाली होती मात्र प्रमोद शेठ म्हसकर यांनी काही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या न्यूज बातम्या आणि खड्ड्यांचे दुश्य पाहून तात्काळ आपल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांना आदेश दिले आणि चक्क खड्डे बुजवून मार्ग चकाचक करून असंखे प्रवाशांच्या जीवाचा धोका सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केला याचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे.

प्रशासनाच्या आणि लोकनेत्यांच्या नुसत्या आढावा बैठका, तू मारल्यासारखे कर,  मी रडल्यासारखे करतो... असंच...! अजतगत पहावयास मिळत आहे.रस्ते महामार्गाच्या कामाचे टेंडर भरण्यासाठी असंखे ठेकेदार रांगेत मात्र काम करणे अथवा तो कोणत्या दर्जाचा असावा यावर मात्र कोणाचे नियंत्रण हे मात्र गुलदस्त्यात. मुंबई गोवा महामार्गाबाबत कोणतीही ठोस भूमिका नाही अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामे तर काही ठिकाणी नवे बनविण्यात आलेले उड्डाण पूल हे देखील ढासळण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे आतापर्यंत सोहळा सतरा वर्षे हे काम रखडले मात्र पूर्ण होण्यासाठी अजून कोकणवासीयांना किती काळ प्रतीक्षा करावी लागणार हे पाहणे गरजेचे आहे.पण तालुक्यासाठीची ही नवीन ओळख बघा...तरुणाच्या गळ्यातील ताईत बघा...  नेमके काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे येथील सुपुत्र प्रमोद शेठ म्हसकर हे जनसामान्य माणसाच्या हृदयातील प्रेम आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा विचार आणि संदेश हा घरोघरी या सामाजिक उपक्रमातून पोचला जाणार हे आधोरेखीत आहे.तर समाजातून प्रमोद शेठ अनंत म्हसकर तसेच वृत्तपत्र वाहिन्या आणि त्यांच्या प्रतिनिधींचे आभार मानले जात आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट