सेवेशी ठाई तत्पर, प्रमोदशेठ म्हसकर, प्रतिष्ठानच्या वतीने कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाखालील खड्डे बुजविले.
- by
- Aug 04, 2026
रोहा :- मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाखालील तसेच सर्व्हिस रोडवर भयानक झालेल्या पावसामुळे मोठ मोठे खड्डे पडले असून यात अपघात होत होते मात्र सदरील ठेकेदार आणि अधिकारी वर्गाला काही ही घेणे देणे नाही मात्र येतील प्रवासी वर्गाचा अथवा नागरिकांचा कोणताही अपघात होऊ नये याची तात्काळ दखल घेत कोणतेही पद, सत्ता नसताना सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारा खरा लोकनेता म्हणजे प्रमोद शेठ म्हसकर यांनी त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून रखडलेल्या कोलाड आंबेवाडी नाका रहदारीच्या मार्गावरील पडलेले खड्डे बुजवून पुन्हा एकदा एक समाजाप्रती वेगळा आदर्श निर्माण केला आहे.तर वृत्त पत्राने तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा यामुळेचे हा संदेश एका सामाजिक आणि लोकाभिमुख कार्यकर्त्यांपुढे गेला आणि त्याचे उत्तम उदाहरण आज या कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाखाली भयानक पडलेले खड्डे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आला असून प्रमोद शेठ म्हसकर यांचे विशेष कौतुक होत असून वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या तसेच त्यांच्या प्रतिनिधींचे देखील येथील जनतेतून आभार मानले जात आहेत.
गेली अनेक दिवसांपासून या उड्डाण फुलाखाली भले मोठे जीवघेणे खड्डे पडले होते तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला असणारे सर्व्हिस रोड हे देखील पूर्णतः खड्ड्यांमुळे निकामी झाले होते.यावर उपाय योजना कराव्या यासाठी अनेकांनी ठेकेदार आणि सदरील अधिकारी यांना सोशल मीडियावर आणि वृत्त पत्राच्या माध्यमातून विणविण्या केल्या मात्र यावर नेहमी प्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून कानाडोळा.तर मागील दोन दिवसांत अधिक हे खड्डे भयानक झाल्याने दुचाकी चारचाकी वाहन अडकून राहत होती तसेच एक प्रवासी बस या खड्ड्यातून कलंडता कलंडता बचावली हे दृश्य तर भयानक पाहून अनेकांच्या जीवाची धाकधूक तर पादचारी वर्गाला देखील जीव मुठीत धरून जा ये करावे लागत होते.अत्यंत दयनीय अवस्था येथील सर्व्हिस रस्त्याची आणि उड्डाण फुलाखाली झाली होती मात्र प्रमोद शेठ म्हसकर यांनी काही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या न्यूज बातम्या आणि खड्ड्यांचे दुश्य पाहून तात्काळ आपल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांना आदेश दिले आणि चक्क खड्डे बुजवून मार्ग चकाचक करून असंखे प्रवाशांच्या जीवाचा धोका सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केला याचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे.
प्रशासनाच्या आणि लोकनेत्यांच्या नुसत्या आढावा बैठका, तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो... असंच...! अजतगत पहावयास मिळत आहे.रस्ते महामार्गाच्या कामाचे टेंडर भरण्यासाठी असंखे ठेकेदार रांगेत मात्र काम करणे अथवा तो कोणत्या दर्जाचा असावा यावर मात्र कोणाचे नियंत्रण हे मात्र गुलदस्त्यात. मुंबई गोवा महामार्गाबाबत कोणतीही ठोस भूमिका नाही अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामे तर काही ठिकाणी नवे बनविण्यात आलेले उड्डाण पूल हे देखील ढासळण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे आतापर्यंत सोहळा सतरा वर्षे हे काम रखडले मात्र पूर्ण होण्यासाठी अजून कोकणवासीयांना किती काळ प्रतीक्षा करावी लागणार हे पाहणे गरजेचे आहे.पण तालुक्यासाठीची ही नवीन ओळख बघा...तरुणाच्या गळ्यातील ताईत बघा... नेमके काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे येथील सुपुत्र प्रमोद शेठ म्हसकर हे जनसामान्य माणसाच्या हृदयातील प्रेम आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा विचार आणि संदेश हा घरोघरी या सामाजिक उपक्रमातून पोचला जाणार हे आधोरेखीत आहे.तर समाजातून प्रमोद शेठ अनंत म्हसकर तसेच वृत्तपत्र वाहिन्या आणि त्यांच्या प्रतिनिधींचे आभार मानले जात आहे.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times