वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

म्हाडातर्फे १० ऑगस्ट रोजी २० वा लोकशाही दिन

  • by
  • Aug 08, 2026

संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या तक्रारींवर चर्चा; तात्काळ निर्णय घेण्यात येणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) २० वा लोकशाही दिन सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात हा लोकशाही दिन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

म्हाडा प्रशासनाने नागरिकांना या लोकशाही दिनात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जानेवारी २०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींवर थेट चर्चा करून त्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आजपर्यंत म्हाडामध्ये १९ लोकशाही दिनांचे यशस्वी आयोजन संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.

नागरिकांच्या तक्रारींवर थेट चर्चा

लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी व अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट आणि खुली चर्चा केली जाते. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यास मदत झाली आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळत असून म्हाडा प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकांप्रती संवेदनशील बनत असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

प्रत्येक लोकशाही दिनापूर्वी संजीव जयस्वाल यांच्याकडून यापूर्वीच्या लोकशाही दिनांमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जातो. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींच्या पाठपुराव्याला गती मिळत असून लोकशाही दिन हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा मजबूत दुवा ठरत आहे.

अर्जासाठी १५ दिवस आधीची मुदत

लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी तक्रार अर्ज विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी अर्जाच्या दोन प्रती सादर करणे आवश्यक राहील.

विहित नमुन्यातील अर्ज म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘नागरिकांसाठी’ या विभागातील ‘लोकशाही दिन’ या सदरामध्ये उपलब्ध आहे.

लोकशाही दिनासाठी सादर करण्यात येणारी तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे.

कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत?

न्यायप्रविष्ट प्रकरणे, महसूल/अपीलविषयक प्रकरणे, सेवाविषयक किंवा आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले अर्ज तसेच आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज लोकशाही दिनासाठी स्वीकारले जाणार नाहीत.

तसेच, ज्या प्रकरणात अंतिम उत्तर देण्यात आले आहे किंवा देण्यात येणार आहे, अशा प्रकरणासंदर्भात त्याच विषयावर पुन्हा सादर केलेले अर्जही स्वीकारले जाणार नाहीत. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसल्यास ते देखील लोकशाही दिनासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

लोकशाही दिनासाठी स्वीकारता न येणारे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी आठ दिवसांच्या आत पाठविण्यात येतील. त्याची प्रत अर्जदारालाही देण्यात येणार असल्याचे म्हाडा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट