
मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई आवश्यक : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे दि.७:- मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले आहे.मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे झाळे वाढणे आवश्यक आहे असे मत उप सभापती डॉ .नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले .
ग्रीन हिल्स ग्रुप या संस्थेतर्फे देवराई फाउंडेशन,सहयाद्री देवराई,वनाई नैसर्गिक शेती फार्म आणि कृषी पर्यटन केंद्र या संस्थांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "देवराई" संकल्पनेवर आधारितप्रदर्शन आणि प्रकल्पांचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले आहे.त्या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.,पुण्याचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते, जेहलम जोशी,पर्यावरण संवर्धन अधीक्षक मंगेश दिघे,ग्रीन हिल्स ग्रुपचे प्रमुख अतुल वाघ,देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले,भूजल विज्ञान शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे,देववन संकल्पनेचे किशोर मोहोळकर आणि वनाई नैसर्गिक शेती फार्म व कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक अथर्व वेताळ सहयाद्री देवराईच्या स्मिता जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,येत्या कालावधीत आपल्या सर्वांना रिफ्युज,रियुज , रिड्युस,रिसायकल आणि रिथिंक या पाच " आर " वर काम करावे लागणार आहे.किल्ले आणि दुर्ग संवर्धनासाठी राज्यसरकारने 3 टक्के निधी मंजूर केला आहे.या निधीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टीने अधिकधिक काम करण्याची गरज आहे.त्याच बरोबर आपण सर्वानीच वनविभागाच्या ज्या जागा आहेत. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम केले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, प्रत्येक तालुक्यात देवराई निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.परंतू जीआर निघून ही या योजनेचा पुरेसा प्रचार प्रसार झालेला नाही.पण सध्याचा काळ हा सोशल मिडीयाचा असून या माध्यमांचा वापर करून आपल काम, योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच काम करावे, शासनाच्या प्रत्येक योजनेत समाजाचा देखिल सहभाग असणे आवश्यक आहे.या दृष्टीने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी देखील याबाबत पुढाकार घ्यावा,पुणे मनपाने देखील सामाजिक संस्थांशी समन्वय साधत फोरम ची स्थापना करून राज्य सरकारच्या पर्यावरण पूरक योजना प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्ट्रीने कार्यतत्पर राहावे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times