Breaking News
मुंबई : नाइट फ्रँक इंडियाने आपल्या मालकीच्या अर्धवार्षिक अहवालाच्या 14व्या आवृत्तीचे- इंडिया रिअल इस्टेट- एच2 2020 चे अनावरण केले आहे. त्यातून जुलै-डिसेंबर 2020 (एच2 2020) या कालावधीत आठ मोठ्या शहरांमध्ये निवासी आणि कार्यालय बाजारपेठांच्या कामगिरींचे सर्वांगीण विश्लेषण सादर करण्यात आले आहे. या अहवालात असे दर्शवण्यात आले आहे की, 2020च्या दुसर्या सहामाहीमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) 1.7 दशलक्ष चौ. फूट जागेवर कार्यालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद झाली. 2020च्या दुसर्या सहामाहीमध्ये सरासरी व्यवहार करण्यात आलेल्या भाड्यांमध्ये वर्षानुवर्षे 5.6 टक्के घट झाल्याचे नोंदवण्यात आले. 2020च्या चौथ्या तिमाहीमध्ये कार्यालयीन व्यवहारांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. व्यवहारांमध्ये वर्षानुवर्षे 8 टक्क्यांची वाढ होऊन 1.1 दशलक्ष चौ. फूटांपर्यंत पोहोचले, ही वाढ 2019च्या सरासरी तिमाहीच्या 46 टक्के होती.
बीकेसी व ऑफ-बीकेसी आणि मध्य मुंबई अशा व्यवसाय केंद्रांत 2020च्या दुसर्या सहामाहीमध्ये कार्यालयीन भाड्यामध्ये मोठी वाढ दिसण्यात आली, अनुक्रमे वर्षानुवर्षे 32 टक्के व 24 टक्के. ताबादारांच्या प्रोफाइलच्या संदर्भात निर्माण क्षेत्रासाठी 2020च्या दुसर्या सहामाहीदरम्यान सर्वोच्च व्यवहार दिसण्यात आले. हे प्रमाण 25 टक्के होते. त्यानंतर बीएफएसआय 23 टक्क्यांवर होते. सह-कामकाज ऑपरेटर्स कार्यक्षमतेने जागा घेत आहेत आणि एकूण व्यवहारांमधील त्यांचा हिस्सा दुप्पटीहून अधिक होत 2019च्या दुसर्या सहामाहीमधील 7 टक्क्यांवरून 2020च्या दुसर्या सहामाहीदरम्यान 18 टक्क्यांपर्यंत पोहोचला. हा अहवाल निदर्शनास आणतो की, मुद्रांक शुल्कामध्ये कपात झाल्यामुळे 2020च्या दुसर्या सहामाहीमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) गृहविक्रीत वर्षानुवर्षे 10 टक्क्यांसह 30,042 युनिट्सपर्यंत वाढ दिसण्यात आली. सप्टेंबर 2020 पासून विक्रीमध्ये वाढ झाली आणि वर्ष अखेरपर्यंत प्रबळ वाढ दिसण्यात आली. 2020 च्या चौथ्या तिमाहीमध्ये विक्रीत वर्षानुवर्षे 80 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली. 2020 मध्ये सरासरी किंमत वर्षानुवर्षे अंदाजे -3.2 टक्क्यांसह प्रति चौ. फूट 6,787 रूपये होती.
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये कपात करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे गृहखरेदीदारांच्या भावनांना चालना मिळाली आहे, ज्यामुळे 2019च्या सरासरी तिमाही 147 टक्क्यांच्या तुलनेत 2020च्या चौथ्या तिमाहीदरम्यान गृहविक्रीत वर्षानुवर्षे 193 टक्क्यांची वाढ झाली. प्रांतात 2020च्या तिस-या तिमाहीमधील 7,635 युनिट्सच्या तुलनेत 2020च्या चौथ्या तिमाहीमध्ये 22,407 युनिट्सच्या विक्रीची नोंद झाली. 2020च्या दुस-या सहामाहीदरम्यान एमएमआरमध्ये विक्री करण्यातआलेली 57 टक्केघरे ही 5 दशलक्ष रूपयांच्या (50 लाख रूपये) रकमेतील होती.ती 2019च्या दुस-या सहामाहीमधील 52 टक्क्यांच्या तुलनेत जास्त होती. कारण लॉकडाऊनदरम्यान मोठ्या घरांसाठी मागणी वाढली.
कपात करण्यात आलेल्या मुद्रांक शुल्कामुळे होणारी बचत मोठ्या घरांच्या संदर्भात उच्च असल्यामुळे मध्य व उच्च उत्पन्न विभागांमधील गृहखरेदीदारांनी या कपात करण्यात आलेल्या मुद्रांक शुल्काचा अधिक फायदा घेतला आहे. दक्षिण मुंबई मुंबई (वर्षानुवर्षे 342 टक्के), पश्चिम उपनगर (वर्षानुवर्षे 246 टक्के) आणि मध्य मुंबई (वर्षानुवर्षे 186 टक्के) अशा एमएमआरच्या महागड्या सूक्ष्म-बाजारपेठांमध्ये चौथ्या तिमाहीदरम्यान विक्रीत सर्वाधिक वाढ दिसण्यात आली.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times