Breaking News
वेदांताच्या अनिल अगरवाल फाउंडेशनने त्यांचा नंदघर प्रकल्प गडचिरोली, महाराष्ट्र येथे सादर केले असून त्याद्वारे ३९०० मुलांना सक्षम केले जाईल व १७०० स्त्रिया आणि मुलींना शिक्षण, पोषण, आरोग्य व कौशल्य विकासाच्या संधी दिल्या जाणार आहेत.
गडचिरोली, : सर्वसमावेशक ग्रामीण विकासाच्या दिशेने लक्षणीय पाऊल पुढे टाकत अनिल अगरवाल फाउंडेशनचा प्रमुख उपक्रम – नंदघरने गडचिरोलीच्या जिल्हा परिषदेसह सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या कराराअंतर्गत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील १०० अंगणवाड्यांचे आधुनिक नंदघरात रुपांतर केले जाणार आहे. या भागिदारीला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुहूर्त स्वरूप देत सर्वात वंचित भागात विकास करण्याची राज्याची बांधिलकी दर्शवण्यात आली.
महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने हा उपक्रम सहा वर्षाखालील ३९०० मुले व १७०० स्त्रिया आणि मुलींच्या आयुष्यावर थेट परिणाम घडवून आणेल. आधुनिक केंद्रांद्वारे प्राथमिक शिक्षण, पोषक आहार, प्राथमिक आरोग्यसेवा आणि कौशल्य विकास तसेच समग्र विकासाच्या संधी पुरवल्या जातील. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आदिवासी भागातील विकासाची दरी नाविन्य आणि सर्वसमावेशक भागिदारीद्वारे सांधण्याची बांधिलकी दर्शवणारा आहे.
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आमचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनशी सुसंगत राहत महाराष्ट्र सरकार प्रत्येक मुलाला शिक्षण, आरोग्य व पोषण मिळेल यासाठी प्रयत्नशील असून स्त्रियांना कौशल्यविकास, अर्थज्ञानाच्या संधी आणि संपूर्ण विकासाद्वारे सक्षम केले जात आहे. गडचिरोलीतील १०० अंगणवाड्यांचे नंदघरात रुपांतर करण्यातून सार्वजनिक- खासगी क्षेत्रात किती मजबूत भागिदारी होऊ शकते हे दर्शवणारे आहे. अशाप्रकारचे उपक्रम महाराष्ट्रभरात राबवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
ठाणे येथील २५ अंगणवाड्यांचे नंदघरात रुपांतर करण्यात आले असून त्याला मिळालेल्या यशाच्या पायावर ही भागिदारी आधारित असून ती भारताच्या इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (आयसीडीएस) आणि पोषण २.० प्रकल्पांशी सुसंगत आहे. या उपक्रमामुळे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयांना (एसडीजी), ४ (दर्जेदार शिक्षण), २ (भुकेचे उच्चाटन) आणि ५ (लिंग समानता) चालना मिळणार असून त्यामुळे मुले व स्त्रियांना सर्वसमावेशक प्रगतीमध्ये केंद्रस्थान मिळेल.
आधुनिक अंगणवाडी केंद्रांमध्ये आकर्षक बीएएलए (बिल्डिंग अज अ लर्निंग एड), डिझाइन्स, एलईडी टीव्ही – ई लर्निंग, मुलांसाठी सोयीस्कर फर्निचर आणि पिण्याचे सुरक्षित पाणी, वीज व स्वच्छता अशा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
हे नंदघर दिवसभरात दोन टप्प्यात काम करतील. सकाळी मुलांचे प्राथमिक शिक्षण आणि पोषणावर भर दिला जाईल, तर दुपारी समाजकेंद्रित उपक्रमांवर भर असेल. त्यामध्ये ६०० गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता व १०० मुलींसाठी आरोग्य जागरूकता सत्रे, लघु उद्योग वर्कशॉप्स आणि कौशल्य विकास यांच्यावर भर असेल. यातून त्यांना स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत केली जाईल.
हिंदुस्थान झिंक लि. च्या अध्यक्ष आणि वेदांता लि.च्या नॉन- एक्झक्युटिव्ह संचालक प्रिया अगरवाल हेब्बर नंदघरच्या विस्ताराच्या अग्रणी असून या प्रकल्पाच्या दीर्घकालीन परिणामाविषयी त्या म्हणाल्या, ‘प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी आणि प्रत्येक स्त्रीला विकास करण्यासाठी योग्य संधीची गरज असते. गडचिरोली येथे नंदघर सादर करण्यातून आम्ही कित्येक पिढ्यांपासून अस्तित्वात असलेली दरी सांधण्यासाठी अर्थपूर्ण पाऊल उचलत आहोत. समाज कल्याणासाठी आम्ही बांधील आहोत तसेच राज्य सरकारच्या मदतीने ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रिया व मुलांचे आरोग्य, पोषण व शिक्षणात सुधारणा घडण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’
नंदघरने यापूर्वी १५ राज्यांत ८३०० केंद्रे स्थापन केली असून त्याद्वारे लाखो स्त्रिया व मुलींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे नुकतेच राजस्थान सरकारसह भागिदारीचे नूतनीकरण करण्यात आले व त्याअंतर्गत २५,००० केंद्रांची राज्यभरात स्थापन केली जाणार आहे. निरोगी, सुशिक्षित व स्वयंपूर्ण भारत घडवण्याच्या नंदघराच्या प्रवासात गडचिरोली येथील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times