Breaking News
पालघर : नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात 40 मीटर लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवला आहे.
या मार्गाचा महाराष्ट्रातील विभाग 156 किमी लांब असून त्यात समावेश आहे —
• वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (मुंबई) येथे एक भुयारी स्थानक
• मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्याच्या शिळफाटा दरम्यान 21 किमी लांबीचा बोगदा
• शिळफाटा ते झरळी गाव (महाराष्ट्र-गुजरात सीमा) पर्यंत 135 किमी उंचावरील मार्गिकेचा, ज्यामध्ये समावेश आहे
A. 124 किमी लांबीचा व्हायाडक्टचा, ज्यामध्ये समावेश आहे
• 103 किमी लांबीचा व्हायाडक्ट, ज्यामध्ये 2,575 एफएसएलएम गर्डर्सचा समावेश आहे
• 17 किमी लांबीचा भाग सेग्मेंटल गर्डर्सने तयार करण्यात आलेला आहे
• 2.3 किमी लांबीचे स्टील पुल, जे राष्ट्रीय महामार्ग, डीएफसीसी, भारतीय रेल्वे आणि उल्हास नदीवर बांधले जात आहेत
• ठाणे, विरार आणि बोईसर येथील बुलेट ट्रेनच्या 3 स्थानकांमध्ये एकूण 1.3 किमी लांबीचा भाग
B. एकूण 11 किमी लांबीचा भाग, ज्यामध्ये समावेश आहे
• 6 किमी लांबीचे 7 डोंगरी बोगदे
• 5 किमी लांबीच्या विशेष मातीच्या संरचना
प्रत्येक 40 मीटर लांबीचा पीएसकी बॉक्स गर्डर सुमारे 970 मेट्रिक टन वजनाचा असतो, ज्यामुळे तो भारताच्या बांधकाम क्षेत्रातील सर्वात जड गर्डर ठरतो. हे गर्डर्स कोणतेही बांधकाम सांधे न ठेवता, एकसंध स्वरूपात घडवले जातात. प्रत्येक गर्डरसाठी 390 घनमीटर काँक्रीट आणि 42 मेट्रिक टन स्टील वापरले जाते.
फुल-स्पॅन गर्डर्सना बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्राधान्य दिले जाते, कारण ते सेग्मेंटल गर्डर्सपेक्षा सुमारे 10 पट जलद गतीने बांधकाम पूर्ण करण्यास मदत करतात.
पूर्ण लांबीचे प्री-कास्ट बॉक्स गर्डर्स विशेष स्वदेशी अवजड यंत्रसामग्रीद्वारे बसवले जात आहेत, ज्यामध्ये स्ट्रॅडल कॅरिअर्स, ब्रिज लॉन्चिंग गॅन्ट्रीज, गर्डर ट्रान्सपोर्टर्स आणि लॉन्चिंग गॅन्ट्रीज यांचा समावेश आहे. अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे गर्डर्स आधीच तयार करून समर्पित कास्टिंग यार्डमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने साठवले जात आहेत.
शिळफाटा ते गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या मार्गिकेवर एकूण 13 कास्टिंग यार्ड्स नियोजित करण्यात आले आहेत, त्यापैकी सध्या 5 यार्ड्स कार्यान्वित आहेत.
ही सिद्ध तंत्रज्ञान प्रणाली एप्रिल 2021 पासून बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरात आहे आणि गुजरातमध्ये एकूण 307 किमी लांबीचा व्हायाडक्ट पूर्ण करण्यात यामुळं मोठा वाटा उचललेला आहे.
अलीकडील महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विरार आणि बोईसर स्थानकांवरील पहिल्या स्लॅबच्या कास्टिंगचा समावेश आहे.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
ROHAN RASAL